भुसावळ पालिकेची आजपासून बड्या थकबाकीदारांविरोधात धडक मोहिम
शंभर मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांना पथक ठोकणार सील : थकबाकी भरण्याचे आवाहन
Bhusawal Municipality’s strike campaign against big arrears from today भुसावळ पालिका कराची थकबाकी वर्षानुवर्षे न भरणार्या थकबाकीदारांविरोधात पालिकेने बुधवारपासून धडक मोहिम उघडली आहे.शहरातील शंभर कर थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्या मालमत्तांना बुधवारपासून पालिकेचे विशेष पथक सील ठोकणार आहे.
थकबाकीदारांच्या गोटात प्रचंड खळबळ
प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेद्र पाटील, मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात येणार आहे. थकीत कराची रक्कम भरण्याBhusawal Municipality’s strike campaign against big arrears from todayसाठी सूचित केल्यानंतर नोटीसा देण्यात आल्या मात्र त्यानंतरही थकबाकी येत नसल्याने बुधवारी संबंधित शंभर मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सील ठोकण्यात येईल.



