अंजनसोंडे शिवारात दोन कुत्र्यांचा बिबट्याने पाडला फडशा
भुसावळ : गेल्या काही दिवसांपासून वरणगाव फॅक्टरी शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून मंगळवारी पहाटेच्या सुमारास अंजनसोंडे, ता.भुसावळ शिवारात बिबट्याने दोन कुत्र्यांवर हल्ला करून ठार मारल्याचा संशय व्यक्त आहे. वरणगाव फॅक्टरी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन झाल्याने येथील कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याला पकडण्याची मागणी युनियनच्या पदाधिकार्यांनी केली केल्यानंतर वनविभागाच्या अधिकार्यांनी ऑर्डनस फॅक्टरीमध्ये बैठक झाली. बिबट्याला अशाप्रकारे पकडता येत नसल्याची माहिती देण्यात आली तसेच बिबट्यापासून सतर्क कसे रहावे याबाबतचे प्रशिक्षण देण्यत आले
वनविभागाकडून पंचनामा
मंगळवारी पहाटे दोन कुत्रे मेलेली व त्याचे मांस देखील वन्य प्राण्याने खाल्याची बाब समोर आल्याने नागरीक धास्तावले आहेत. वन विभागाच्या कर्मचारी नथू वानखेडे व सुनील पाटील यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.


