जळगाव, औरंगाबादसह नाशिक, बीडमधून दुचाकींची चोरी : चोरट्यांची चौकडी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
Bike theft from Jalgaon, Aurangabad along with Nashik, Beed : A quartet of thieves in MIDC police’s net जळगाव : राज्यातील चार जिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणार्या चौघांच्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संशयितांनी धी । जळगाव शहरासह छत्रपती संभाजी नगर, नाशिक, बीड जिल्ह्यातून दुचाकींची चोरी केल्याची कबुली देत चोरी केलेल्या नऊ दुचाकी काढून दिल्या आहेत. ताब्यातील संशयितांमध्ये एका अल्पवयीनाचा समावेश आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
एमआयडीसीतील राम दालमिल कंपनीच्या गेटसमोरून भूषण दिलीप पाटील (जुने जळगाव) यांची 29 जुलै रोजी दुचाकी (एम.एच.19 डी.वाय.8490) ही चोरीला गेल्यानंतर दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना मेहरुणचे काही तरूण बाहेरगावाहून महागड्या दुचाकी चोरून विक्री करीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने मंगळवार, 17 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता कारवाई करत संशयित आरोपी दानीश शेख कलीम (20, रा.पिरजादेवाडा मेहरूण), सोमनाथ जगदीश खत्री (21 रा.जोशीवाडा मेहरूण), आवेश बाबुलाल पिंजारी (20, मेहरूण) आणि एक अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. संशयितांनी चौकशीदरम्यान चोरी केलेल्या नऊ दुचाकी काढून दिल्या. या दुचाकी त्यांनी जळगाव, छत्रपती संभाजी नगर, नाशिक आणि बीड जिल्ह्यातून चोरी केल्याची कबुली दिली.


यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हवालदार गणेश शिरसाळे, योगेश बारी, किशोर पाटील, सचिन पाटील, छगन तायडे, किरण पाटील, ललित नारखेडे आदींच्या पथकाने केली.
