फैजपूरातील क्लीनरला जळगावात चिरडले : ट्रक चालकाला अटक
Faizpur cleaner crushed in Jalgaon : Truck driver arrested जळगाव : खातरजमा न करता ट्रक सुरू करून ट्रक क्लीनरला चिरडण्यात आल्याची धक्कादायक घटना जळगावातील एमआयडीसीतील कंपनीसमोर बुधवारी दुपारी दोन वाजता घडली. या घटनेत क्लिनर दीपक विनोद मेढे (38, रा.फैजपूर, ता.यावल) यांचा मृत्यू ओढवला. याप्रकरणी अतीश अरविंद मेढे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक शेख मजझर शेख अख्तर (फैजपूर) याच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अशी घडली घटना
जळगाव शहरातील एमआयडीसीमधील खान्देश फिलेरो येथे गहू खाली करण्यासाठी चालक शेख मजझर व क्लीनर दीपक मेढे हे आले होते. कंपनीसमोर दह चाकी ट्रक (एम.एच.19 सी.वाय.92017) हा चालक शेख मजझर यांनी लावल्यानंतर ट्रक खाली क्लीनर दीपक मेढे हे झोपले होते मात्र दुपारी 12.10 वाजेच्या सुमारास चालकाने खातरजमा न करता ट्रक काढल्याने मागील चाकाखाली चिरडले जावून दीपक यांचा मृत्यू झाला.


या घटनेत क्लीनरच्या चेहर्याचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून हात-पायदेखील तुटले. घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली. पंचनमा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. मयताच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण, भाऊ असा परीवार आहे. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.
