भुसावळ शहरातील दे.ना.भोळे महाविद्यालयाचा कबड्डी संघ स्पर्धेत उपविजयी
भुसावळ : जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत जिल्हास्तरीय आंतर शालेय कबड्डी स्पर्धा 14 सप्टेंबर रोजी जळगाव येथे बाहेती कॉलेजच्या मैदानावर झाल्या. त्यात 19 वर्षाखालील गटात दादासाहेब देविदास नामदेव भोळे ज्युनियर कॉलेज कब्बडी संघाने उप विजेतेपद पटकावले.
जळगाव जिल्हा शालेय कबड्डी स्पर्धा प्रथम फेरीत चोपडा संघाचा 22 गुणांनी पराभव करून भोळे महाविद्यालय विजयी झाले,
द्वितीय फेरीत चाळीसगाव तालुका संघाविरुद्ध 23-20 गुण मिळवून 03 गुणांनी भोळे महाविद्यालय विजयी तर सेमीफायनलमध्ये पाचोरा तालुका संघावर 6 गुणांनी विजय मिळवून भोळे महाविद्यालय (26-20) भुसावळ फायनलमध्ये पोहोचले. अंतीम सामना दिगंबर पाटील महाविद्यालय एरंडोलविरुद्ध भोळे महाविद्यालय, भुसावळ यांच्यात झाला. सामना अत्यंत चुरशीचा झाला. शेवटच्या मिनिटापर्यंत होऊन 3 गुणांनी भोळे महाविद्यालय उपविजयी ठरले.

यशस्वी खेळाडूंचा गौरव
यशस्वी खेळाडूंचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक, प्रा.डॉ.संजय चौधरी,, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.जे.पी.सरोदे, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रकाश सावळे, आयोजक हरीश शेळके यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेमध्ये अखिलेश कुट्टरवार, महेश पवार, निशांत वारुळकर, प्रतीक अवसरमल, सद्दाम शेख, भावेश सोनवणे, मंथन वानखेडे, भूषण गुंजाळ भावेश बडगुजर यश इंगळे यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली.


