धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर-मुंबई व पुणे-सोलापूर मार्गावर विशेष गाड्या
भुसावळ : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने नागपूर ते मुंबई आणि पुणे-सोलापूर ते नागपूर या चार एकेरी विशेष गाड्यांची सुविधा केल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वेतर्फे सुरू करण्यात येत असलेल्या विशेष गाड्यांचे आरक्षित डब्यांचे तिकीट बुकिंग शुक्रवारपासून सुरू झाले आहे.






नागपूर-मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस वन वे स्पेशल 20 (आयसीएफ) कोच 01018 वन वे स्पेशल नागपूर येथून मंगळवार, 24 रोजी रात्री 8 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसर्या दिवशी दुपारी 12 वाजता पोहोचणार आहे. ही गाडी नागपूर, अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वेस्थानकावर थांबेल. या गाडीला पाच द्वितीय आसनश्रेणी, दोन लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह 15 सामान्य द्वितीय श्रेणी असे एकूण 20 डबे असतील.
नागपूर-पुणे वन वे स्पेशल कोच 01030 एकेरी विशेष गाडी मंगळवार 24 रोजी नागपूर येथून रात्री 11 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्या दिवशी संध्याकाळी 5.45 वाजता पोहोचेल. ही गाडी नागपूर, अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, नगर, दौंड मार्ग आणि पुणे या रेल्वेस्थानकावर थांबेल. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, 13 शयनयान, आठ सामान्य द्वितीय श्रेणीसह दोन लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन असे एकूण 24 डबे असतील.
नागपूर-मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस वन वे स्पेशल 01032 एकेरी विशेष गाडी बुधवार, 25 नागपूर येथून दुपारी तीन वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसर्या दिवशी सकाळी 8.15 वाजता पोहोचणार आहे. ही गाडी नागपूर, अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला पोचेल. सोलापूर-नागपूर वन वे स्पेशल 01029 एकेरी सुपरफास्ट स्पेशल मंगळवार, 24 रोजी रात्री 8.20 वाजता सोलापूर येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसर्या दिवशी दुपारी 1.05 वाजता पोहोचेल. ही गाडी सोलापूर, कुर्डीवाडी, दौंड, नगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा आणि नागपूर या रेल्वे स्थानकावर थांबेल. या गाडीला दोन लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 24 सामान्य द्वितीय श्रेणी कोच असतील.


