मुक्ताईनगर पोलिस ठाण्यातून डंपर पळवण्यास पोलिसाने केले सहाय्य : ‘त्या’ कर्मचार्‍याचा कसुरी अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे


Police helped to drive dumper from Muktainagar police station : ‘That’ employee’s complaint to District Superintendent of Police भुसावळ : अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍या डंपरला पकडून महसूल पथकाने मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर मुजोर वाळू माफियांनी हा डंपरच पोलिस ठाण्याच्या आवारातून लांबवल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला होता. ‘दैनिक तरुण भारत’ने मंगळवारच्या अंकात ठळक वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पोलिस प्रशासनाने या प्रकरणात फिर्यादी होत तिघांविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना बेड्या ठोकल्या तर पळवलेला डंपरही जप्त केला होता. दरम्यान, पोलिस ठाण्यातून डंपर पळवण्यास सहाय्य केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागाचे कर्मचारी धर्मेंद्र ठाकूर यांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्यांचा कसुरी अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.

असे आहे नेमके प्रकरण
शुक्रवार, 13 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1.35 वाजता दीपनगर गेटजवळ विना क्रमांकाचे पिवळ्या रंगाचे डंपर भुसावळातील महसूल पथकाला न जुमानता मुक्ताईनगरकडे निघाल्यानंतर पथकाने त्यास पकडले होते व हे डंपर पहाटेच्या सुमारास पोलिस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले होते मात्र सोमवार, 16 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हे डंपर पोलिस ठाण्याच्या आवारातून लांबवण्यात आल्याने पोलिस दलावर टिकेची झोड उठली होती.



पोलिस अधीक्षकांची दखल न आरोपी कारवाईच्या कोठडीत
डंपर पळवल्याची बाब महसूल पथकाने जिल्हाधिकार्‍यांना कळवली व जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे याबाबत विचारणा केल्यानंतर तपासचक्रे वेगाने फिरवण्यात आली. मंगळवारी, 17 ऑक्टोबर रोजी जळगावजवळून डंपरसह राज मनोज कवळे (28, शंकरराव नगर, जळगाव, शंकर वासुदेव सोनवणे (24, शंकरराव नगर, जळगाव) यांना बेड्या ठोकण्यात आल्या. विशेष बाब म्हणजे आरोपींनी पथकाला सुरूवातीला जो डंपर काढून दिला तो मुळातच पोलिस ठाण्यातून पळवलेला नव्हता याबाबतही चर्चेचे गुर्‍हाळ सुरू होताच पोलिसांनी पुन्हा मूळ डंपरचा शोध घेत ते ताब्यात घेतले.

गोपनीय पोलिस कर्मचार्‍याने केला शिस्तीचा भंग
मुक्ताईनगर पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागाचे कर्मचारी धर्मेंद्र ठाकूर यांच्या गोपनीय कक्षात सोमवारी सायंकाळी संशयित आरोपी आल्यानंतर त्यांनी डंपरबाबत विचारणा केली. त्यावेळी ठाकूर यांनी त्यांना आम्ही हा डंपर पकडला नसल्याचे सांगत महसूलची कारवाई असल्याचे सांगितले मात्र पोलिस ठाण्यात डंपर जमा असताना तो पोलिसांच्या निगराणीत आहे ही बाब ठाकूर विसरले कसे? असा प्रश्न यातून समोर आला व सीसीटीव्ही फुटेजमध्ये तसेच आरोपीच्या कबुली जवाबातून सारे स्पष्ट होताच निरीक्षक नागेश मोहिते यांनी अधीक्षकांकडे कसुरी अहवाल गुरुवारी सादर केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !