भुसावळ बाजारपेठ पोलिसांची मोठी कामगिरी : चोरीच्या सात दुचाकींसह त्रिकूट जाळ्यात
फैजपूरसह भुसावळातील संशयितांकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता
Big achievement of Bhusawal market police: Trio nabbed with seven stolen bikes भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरी केलेल्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. संशयित अल्प दरात दुचाकींची विक्री करीत असल्याने त्याबाबतची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. सैय्यद शाहरूख सैय्यद रहेमान (29, पंचशील नगर, भुसावळ), दानिश उर्फ गोलू शरीफ खान (24, दीनदयाल नगर, भुसावळ) व कामीलोद्दीन अजीजद्दोनीन (30, फैजपूर, त.यावल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
दरम्यान, आरोपींनी बाजारपेठ हद्दीतील तीन, शहर हद्दीत एक तर जळगावसह, जामनेर व अमळनेर पोलिस ठाणे हद्दीतून लांबवलेली दुचाकी काढून दिली आहे. पोलिस कोठडीतील चौकशीदरम्यान आणखी काही चोर्यांचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे.


सात दुचाकी संशयितांकडून जप्त
संशयितांनी बाजारपेठ हद्दीतून बजाज पल्सर, सुजूकी, बजाज प्लॅटीना तसेच शहर हद्दीतून बजाज प्लॅटीना तसेच जळगाव शहर हद्दीतून बजाज प्लॅटीना, जामनेर हद्दीतून बजाज पल्सर व अमळनेर पोलिस ठाणे हद्दीतून हिरो होंडा स्प्लेंडर लांबवल्याची कबुली देत सातही गाड्या काढून दिल्यानंतर त्या जप्त करण्यात आल्या. सात दुचाकी चोरीबाबत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळ पोलिस अधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय नेरकर, हवालदार सुनील जोशी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, निलेश चौधरी, यासीन पिंजारी, महेश चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, सचिन चौधरी आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार विजय नेरकर करीत आहेत.
