भालोदला सेवानिवृत्त शिक्षकाकडे धाडसी घरफोडी ; 63 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला


Bhalod Retired Teacher’s Daring Burglary ; 63,000 rupees in issue was delayed यावल : यावल तालुक्यातील भालोद गावातील ग्रामपंचायत मागे असलेल्या घरात चोरट्यांनी घरफोडी करीत सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम मिळून एकूण 63 हजारांचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर फैजपूर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडले
भालोद, ता.यावल येथे ग्रामपंचायतीच्या मागे जगन्नाथ बाबूराव चौधरी हे सेवानिवृत्त शिक्षक राहतात. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराची लाकडी दरवाज्याची पट्टी तोडून घरात प्रवेश करीत कपाटाचे लॉक तोडून कपाटातील सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 63 हजारांचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर जगन्नाथ चौधरी यांनी फैजपूर पोलिसात फिर्याद दिल्यावरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले. तपास सहा.पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश चौधरी करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !