आरक्षणासाठी आमरण उपोषण : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची दिल्ली वारी


Fast unto death for reservation : Chief Minister-Deputy Chief Minister’s turn in Delhi मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी 40 दिवसांची मुदत दिल्यानंतरही आरक्षणाचा तिढा सुटला नसल्याने मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण सुरू केले असून आता पाणी न पिण्याचाही निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी दुपारी तातडीने दिल्लीत दाखल झाले आहेत. उभय नेते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अजित पवार मात्र मुंबईतच
मराठा समाज आरक्षणावरून राज्याचे राजकारण तापले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या दिशेने धाव घेतली आहे. या दोन्ही नेत्यांनी दिल्ली गाठली असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईतच आहेत.

या कारणास्तव गाठली दिल्ली
शिंदे व फडणवीस यांच्या या दौर्‍यामागील कारण समोर आले नसलेतरी आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्यात निर्माण झालेली स्थिती, राज्य मंत्री मंडळाचा रखडलेला विस्तार, महामंडळ वाटप, आमदार अपात्रता कारवाई या मुद्यांवर चर्चा करण्यासाठीच या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रीय राजधानी गाठल्याची चर्चा आहे.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !