नेपाळमध्ये मध्यरात्री भूकंप : 128 नागरीकांचा मृत्यू
Midnight earthquake in Nepal : 128 civilians dead नवी दिल्ली : नेपाळमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भूकंप होवून या घटनेत 128 नागरीकांचा मृत्यू झाला तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या भूकंपाची तीव्रता 6.4 रीश्टर स्केल इतकी आहे. उत्तर भारताच्या काही भागांतही या भूकंपाचा धक्का जाणवल्याचे सांगण्यात आले शिवाय मोठ्या संख्येने नागरीक जखमी झाले आहेत.
ट्विट करीत दिली माहिती
नेपाळच्या पीएमओ कार्यालयानेही ट्विट करुन नेपाळमधील भूकंपाची माहिती दिली. बचाव पथकांना घटनास्थळी पाठवल्यात आले आहे. नेपाळच्या जजरकोट येथील पश्चिम भागात हा शक्तीशाली भूकंप झाला.




जखमींवर तातडीने उपचार
रुकुम जिल्ह्यातच 36 जणांचा मृत्यू झाझला असून मृतांची संख्या 128 वर पोहोचली असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. जजरकोट आणि रुकुम हे पश्चिम नेपाळमधील भूकंपग्रस्त भाग आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बाधित भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आणि ढिगार्यातून बाहेर काढण्यात आलेल्या जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
#UPDATE | Nepal Earthquake | At least 36 people have been confirmed dead in Rukum West, and the toll is expected to rise further This is the update we have been able to get till 5 AM: Chief District Officer of Rukum West Hari Prasad Pant to ANI
At least 34 have been confirmed… https://t.co/cB18CfiOgy
— ANI (@ANI) November 3, 2023
पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. नेपाळमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीमुळे आपण अत्यंत दु:खी आहोत. भारत नेपाळच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे आणि शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे.