पंतप्रधानांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ वाहने भुसावळमार्गे खंडव्याकडे रवाना
सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात वाहने रवाना : आज नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा
Bulletproof vehicles of Prime Minister’s convoy left for Khandwa via Bhusawal भुसावळ : देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांची खंडव्यातील छैगावमाखन येथे रविवारी दुपारी दोन वाजता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा होत आहे. पंतप्रधानाच्या दौर्यांच्या अनुषंगाने त्यांच्या ताफ्यातील चार बुलेटप्रुफ कार भुसावळातील शुक्रवारी संध्याकाळी आल्यानंतर शनिवारी पहाटे पाचला खंडवा येथे बायरोड रवाना झाल्या. पंतप्रधान मोदी यांच्या गाड्या पाहण्यासाठी नागरीकांची मोठी गर्दी झाली होती.
एक लाख लोकांची उपस्थिती
खंडवा विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूक होत असून भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी पीएम नरेंद्र मोदी हे छैगावमाखन येथे येत आहेत. दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांच्या सभेला सुरूवात होईल. यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, प्रदेशाध्यक्ष विष्णूदत्त शर्मा, खंडवा एमपी ज्ञानेश्वर पाटील, गजेंद्र पाटील व जिल्हाध्यक्ष सेवादास पटेल उपस्थित असतील.

बुलेटप्रुफ कार खंडव्याकडे
खंडवा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी येत असून त्यांच्यासाठी त्यांची कार व त्यांच्या ताफ्यातील तीन अश्या चार बुलेटप्रुफ कार शुक्रवारी रात्री 7 वाजता रेल्वेने भुसावळ येथे आल्यात. येथील रेल्वे स्थानकावरील व्हीआयपी साईडींगला या कार उतरविण्यात आल्यात. त्या कार मोटरसायकल पार्कीगमधून बाहेर काढून रात्री डीवायएसपी कार्यालयाच्या आवारात थांबवण्यात आल्या व पहाटे पाच वाजता या गाड्या बायरोड खंडव्याकडे रवाना झाल्या. काळ्या रंगाच्या एकसारख्या गाड्या भुसावळच्या रस्त्यावरून धावत असतांना शहरातील नागरिक कुतूहलाने या गाड्या पाहता होते. गाड्यासोबतच पंतप्रधान मोदी यांची सुरक्षा यंत्रणेतील अधिकारी सोबत होते. यापूर्वीही या गाड्या रेल्वेद्वारे येथे आल्या होत्या.






