युपीतील विवाहितेचे भुसावळ-खामगाव बसमधून दोन लाखांचे दागिने लांबवले
Jewels worth two lakhs stolen from Bhusawal-Khamgaon bus of a married woman in UP भुसावळ : आग्रा येथील विवाहिता बहिणीसह भुसावळ ते खामगाव असा प्रवासी करीत असताना बसमधील गर्दीचा फायदा घेत भामट्याने ट्रॅव्हल्स बॅगेला ब्लेड मारून सुमारे दोन लाखांचे दागिने लांबवले. हा प्रकार मुक्ताईनगर गेल्यानंतर विवाहितेच्या लक्षात आला. विवाहितेने या प्रकारानंतर वाहकाला ही बाब कळवली मात्र बसमध्ये संशयिताबाबत काही माहिती न मिळाल्याने महिलेने बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांची भेट घेत घडला प्रकार सांगितला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात दागिणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पाळत ठेवून चोरीचा संशय
पूनम नितीनकुमार दुबे (32, साधना हाऊस, सैनिक पुरा, मधुनगर, आग्रा, उत्तरप्रदेश) या बहिण सोनी आशिष मिश्रा यांच्या सोबत भुसावळ येथून रविवार, 5 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास भुसावळ-खामगाव बसने खामगाव जाण्यासाठी निघाल्या. दुबे यांच्याकडे असलेल्या मोठ्या ट्रॅव्हल्स बॅगेला बसमधील गर्दी पाहता बसमध्ये चढताना वा बसमध्ये भामट्याने ब्लेड मारले व त्यातील एक लाख 92 हजार 200 रुपये किंमतीचे दागिने भामट्याने लांबवले.


हा प्रकार मुक्ताईनगर शहर ओलांडल्यानंतर महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा भुसावळात धाव घेत बाजारपेठ पोलिसांना माहिती दिली व त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेश चौधरी करीत आहेत.