एक लाखांची लाच भोवली : निफाडचा सहाय्यक निबंधक एसीबीच्या जाळ्यात


Bribe of one lakh : Assistant Registrar of NIFAD in ACB’s net नाशिक : तक्रार अहवाल वरीष्ठांच्या बाजूने पाठवण्यासाठी तडजोडीअंती एक लाखांची लाच मागणार्‍या निफाडमधील सहाय्यक निबंधक राजेश शंकर ढवळे (कृष्णा अपार्टमेंट, फ्लॅट नं.9, चेतना नगर, नाशिक) यांना नाशिक एसीबीने लाच मागणी अहवाल आल्यानंतर अटक केली.

असे आहे लाच प्रकरण
53 वर्षीय तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाचा अहवाल त्यांच्या बाजूने वरिष्ठांना पाठविण्यासाठी आरोपी राजेश ढवळे यांनी 6 सप्टेंबर रोजी दिड लाखांची लाच मागितली व त्याबाबत तक्रार नोंदवण्यात आली. 6 सप्टेंबर रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली मात्र संशय आल्याने लाच स्वीकारण्यात आली नाही मात्र त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर गुरुवारी आरोपीला अटक करण्यात आली. मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला.



यांनी केली कारवाई
पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर, दीपक पवार, संजय ठाकरे, अविनाश पवार, चालक हवालदार संतोष गांगुर्डे, मनोज पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !