हिंगोणा अपघात : खरा ‘डंपर चालक’ यावल पोलिसांच्या जाळ्यात


स्वतःलाच डंपर चालक म्हणवणार्‍या ‘त्या’ मालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

यावल : चोपडा येथील स्वागत समारंभावरून चिंचोलकडे परतणार्‍या नातेवाईकांच्या कु्रझरला भरधाव राखाड वाहून नेणार्‍या डंपरने धडक देवून झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचे बळी गेले होते. सुरूवातीला या प्रकरणी मुकुंदा गणेश भंगाळे (रा.डांभुर्णी) या चालकाला अटक करण्यात आली होती तर त्यावेळी त्याने आपण या डंपरचे मालक असल्याचे सांगितले मात्र प्रत्यक्षात पोलिस तपासात या डंपरचे मालक प्रफुल्ल उर्फ दादू नेहेते असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केल्यानंतर यावल न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

खोटी माहिती अंगलट : गुन्हा दाखल
डंपर चालक असतानाही आपण मालकही असल्याचे खोटी माहिती देणे मुकुंदा गणेश भंगाळे (रा.डांभुर्णी) या चालकाच्या अंगलट आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, डंपर चालक प्रफुल्ल उर्फ दादू नेहेते (22, रा. डांभुर्णी) यास शुक्रवारी अटक करण्यात येवून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !