ड्रग्ज प्रकरण भोवले : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर अखेर पायउतार


पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना हटवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ललित पाटीलवर डॉ.ठाकूर यांनीच उपचार केले होते हे विशेष ! मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. ठाकूर यांना दणका देत त्यांची अधिष्ठाता पदावरील नियुक्ती रद्द केली. माजी अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची 13 जानेवारी रोजी पदावरून तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानंतर डॉ. ठाकूर यांची अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली होती.

मॅटचा निर्णय
डॉ.काळे यांनी या निर्णयाविरोधात ‘महाराष्ट्र अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्यूनल’ने (मॅट) कडे दाद मागितली होती. मॅटने 14 जुलै रोजी डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, डॉ. ठाकूर यांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याबाबत शुक्रवारी हायकोर्टाने चार महिन्यांनी निकाल देत डॉ.ठाकूर यांची नियुक्ती रद्द करत त्यांना दणका दिला आहे. आता त्यांच्या जागी पुन्हा माजी अधिष्ठाता डॉ.विनायक काळे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.






पुढील नियुक्तीची लवकरच ऑर्डर
मुंबई उच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाबाबत ससून रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. विनायक काळे म्हणाले, मॅटचा निकाल माझ्या बाजूने लागल्यावर मुंबई हायकोर्टात त्याविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली. शुक्रवारी अंतिम सुनावणीु पार पडली आणि कोर्टाने अंतिम निर्णय दिला. आता पुढील नियुक्तीची ऑर्डर शासनाकडून लवकरच काढली जाईल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !