प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनातर्फे दिवाळी, छटपूजेसाठी विशेष रेल्वे गाड्या

प्रवाशांची दिवाळीत टळणार गैरसोय : दानापूर, जयपूर, मुंबई, नागपूरसाठी विशेष गाड्या


Special train trains for Diwali, Chhat Puja by railway administration for the convenience of passengers भुसावळ : दिवाळी आणि छटपूजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. दानापूर, जयपूर, मुंबई, नागपूर या मार्गावर या गाड्या धावणार असल्याने प्रवाशांची सुविधा होणार आहे.

मध्य रेल्वेने छटपूजा, दिवाळीसाठी 9 अतिरीक्त उत्सव विशेष चालवणार आहे. रेल्वे गाड्यांना प्रवाशांची अतिरीक्त गर्दी लक्षात घेऊन नागपूर-मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-दानापूर आणि दुर्गापुरा (जयपूर)-दौंड दरम्यान 7 अतिरीक्त विशेष गाड्या चालवणार असल्याने प्रवाशांचा जागेचा प्रश्न काही अंशी सुटणार आहे.







नागपूर-मुंबई वन वे स्पेशल
01103 नागपूर-मुंबई एकेरी विशेष गाडी 16 नोव्हेंबर रोजी नागपूर येथून रात्री 10 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी दुपारी 1.40 वाजता पोहोचेल. ही गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे आणि दादर येथे थांबणार आहे. या गाडीला 24 डब्बे असतील. एक द्वितीय वातानुकूलित, 2 तृतीय वातानुकूलित, 13 शयनयान, 8 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.

मुंबई-दानापूर अतिजलद विशेष चार फेर्‍या
01107 मुंबई-दानापूर अतिजलद विशेष गाडी शनिवार, 18 आणि 25 नोव्हेबरला (2 फेर्‍या) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 11.05 वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसर्‍या दिवशी दुपारी दोन वाजता पोहचेल. 01108 दानापूर-मुंबई अतिजलद विशेष गाडी रविवार, 19 आणि 26 नोव्हेबरला (2 फेर्‍या) दानापूर येथून दुपारी 4.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसर्‍या दिवशी रात्री 11.15 वाजता पोहोचेल. ही गाडी दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडीत दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा येथे थांबणार आहे. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, 13 शयनयान, दोन लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 8 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !