भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश : यावल येथील श्री महर्षी व्यास मंदिरासाठी चार कोटींचा निधी मंजूर
BJP district president Amol Javale’s follow-up successful: Fund of 4 crores approved for Sri Maharishi Vyas temple at Yaval यावल : यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराकरीता प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांच्या प्रयत्नाने चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातील एक कोटी 20 लाखांचा निधी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना वितरीत करण्यात आला आहे. या निधीतून श्री महर्षी व्यास मंदिरावर विविध विकासकामे केली जाणार आहे. लवकरच या कामांची तांत्रिक मान्यता मिळून प्रशासकीय मान्यता मिळत कामाला सुरुवात होणार आहे.
अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश
शहरात श्री महर्षी व्यास मंदिर आहे. या मंदिरातच श्रीराम मंदिरदेखील आहे. या ठिकाणी ग्रंथालय उभारणे, कीर्तनासाठी सभागृह, संतासाठी निवास, ऑडिटोरियम, महाप्रसादालय इत्यादी नवीन बांधकाम करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला व प्रादेशिक पर्यटन विकास योजना 2023- 24 अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या श्री महर्षी व्यास मंदिरासाठी निधी मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून शासन निर्णय अंतर्गत या कामासाठी एक कोटी 20 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भातील पत्र प्राप्त झाले असून यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराचा यातून विकास साध्य होणार आहे. लवकरच तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर कामाला सुरुवात देखील होणार आहे.


दरम्यान, प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून श्री महर्षी व्यास मंदिर व श्री राम मंदिर येथे ग्रंथालय उभारले जाणार आहे,





