भाजी विक्रेत्यांसह घाऊक विक्रेत्यांना भुसावळ बाजार समितीचा पर्याय !

प्रशासकांकडून जागेची पाहणी : हॉकर्स झोन नेहरू मैदानावर होणार !


Bhusawal Bazar Committee option for wholesalers including vegetable sellers!
भुसावळ :
शहरातील वर्दळीच्या आठवडे बाजारात सर्वाधिक डोकेदुखी वाहतूक कोंडी असून त्यातून दररोज होणारे वादाचे प्रकार रोखण्यासाठी पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी मोकळ्या नेहरू मैदानावर हॉकर्स झोन तयार करण्याचा निर्णय घेतला असून शहरातील फळ व भाजीपाल्याच्या घाऊक विक्रेत्यांसह किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांना कृउबाच्या नऊ एकर जागेत हलवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुषंगाने मंगळवारी त्यांनी पदाधिकार्‍यांसमवेत जागेची पाहणी केली.

भाजीपाल्याचा बाजार आता कृउबात भरणार
शहरातील फळ व भाजीपाल्याच्या 54 घाऊक विक्रेत्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जागा देण्यात आली असून घाऊक फळ विक्रेत्यांसह भाजीपाला विक्रेत्यांनाही आता बाजार समितीच्या प्रशस्त जागेत हलवण्यात येणार आहे. अवजड मालवाहतूक करणारे ट्रक व वाहने मुख्य बाजारात प्रवेश करीत असल्याने वाहतूक कोंडी होते व हा प्रश्न सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. शहरातील डेली व आठवडे भाजीबाजार बाजार समितीमध्ये स्थलांतरीत केल्यास तो सोयीची राहिल काय? याबाबतची चाचपणी मंगळवारी प्रांताधिकारी तथा पालिकेचे प्रशासक जितेंद्र पाटील यांनी केली.


कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नऊ एकर जागा उपलब्ध आहे. यात भाजीपाला विक्रेत्यांचे स्थलांतरण झाल्यास सध्याची भाजीबाजाराची जागा हॉकर्स झोनसाठी वापरता येणार आहे शिवाय फळ विक्री करणार्‍या किरकोळ व्यापार्‍यांना नेहरु मैदानावर हलविण्याचे नियोजन आले आहे. पाहणीप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल वारके, उपसभापती शिवाजी पाटील, सचिव नितीन पाटील, व्यापारी प्रतिनिधी योगेश चौधरी आदी उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !