वरणगाव नगरपरीषदेच्या वाढीव कराला स्थगिती
वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची माहिती
Moratorium on increased tax of Varangaon Municipal Council भुसावळ : प्रशासकीय राजवटीमध्ये विविध करांची वाढ करण्यात आली होती. ही वाढ तत्काळ थांबवावी, अशी मागणी भाजपाच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. मागणीची दखल घेत करवाढ थांबवण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली.
पाठपुराव्याला आले यश
नगरपरीषदेने प्रशासक राजवटीत विविध अवास्तव करांची वाढ केल्याने नागरीकांमधून संतापाचा सूर होता. वृक्ष कर, शैक्षणिक कर, रोजगार हमी, सार्वजनिक शौचालय कर, अग्निशमन कर याची आकारणी केल्यामुळे वरणगावकरांवर मोठा भार पडणार होता. अवास्तव करवाढीला भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी नगराधयक्ष सुनील काळे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे विरोध दर्शवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रश्न मांडल्यानंतर भाजपाच्या मागणीला यश आले आहे. सोमवार, 13 नोव्हेंबर रोजी उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी वरणगाव नगरपरीषदेने 2022-23 ते 2025-26 पर्यंतची वार्षिक चतुर्थ कर वसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असल्याचे पत्र काढले आहे.


यांनी केले निर्णयाचे स्वागत
वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची माहितीमाजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, आकाश निमकर, प्रणिता पाटील, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, कामगार नेते मिलिंद मेढे, शामराव धनगर, साबीर कुरेशी, हाजी अल्लाउद्दीन शेख, फजल मोहम्मद, गजानन वंजारी, सुभाष धनगर, युसूफ खान नूर खान, योगेश माळी, ज्ञानेश्वर घाटोळे, मिलिंद भैसे, हितेश चौधरी आदींनी या निर्णयाचे स्वागत केले.





