तांब्याचे शिक्के देण्याच्या बहाण्याने जम्मूतील प्रौढाला मारहाण करीत लूटले : कुर्‍हाकाकोडातील चौकडी जाळ्यात

मुक्ताईनगर पोलिसांची कामगिरी : टोळ्या पुन्हा झाल्या सक्रिय


Adult beaten and robbed in Jammu on the pretext of giving copper stamps : Kurhakoda gang nabbed मुक्ताईनगर : यू ट्यूबवर तांब्याचे शिक्के विक्री असल्याची थाप मारून जम्मूतील प्रौढाला कुर्‍हाकाकोडा शिवारात बोलावून त्यास पट्ट्याने मारहाण करीत लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चौकडीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या परीसरात पुन्हा टोळ्या सक्रिय झाल्याने नागरीकासह व्यापार्‍यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

युट्यूबवर व्हिडिओ अन् झाली फसवणूक
सईद नूर मोहम्मद अदाबी (45, सिदान मोहल्ला रत्नपुरा पुलवामा, राज्य जम्मूकश्मीर) हे तक्रारदार असून नक्षत्र व नवग्रहांचे खडे असलेल्या अंगठ्या विक्री करून ते परीवाराचा उदरनिर्वाह करतात. 20 नोव्हेंबर रोजी त्यांनी युट्यूबवर तांब्याच्या शिक्क्यांबाबत जाहिरात पाहिली व त्याखालील दिलेल्या 9307832277 वर त्यांनी संपर्क केल्यानंतर मुक्ताईनगरात त्यासाठी यावे लागेल, असे सांगितले होते. त्यानुसार अदाबी हे 21 रोजी दुपारी 12.30 वाजता भुसावळात आले व तेथून बसने मलकापूर पोहोचले.



संबंधित राम उर्फ डिगंबर रमेश सोनवणे नाव सांगणारा मोबाईल धारक मलकापूर बसस्थानकावर आल्यानंतर त्याने कुर्‍हापर्यंत बसने नेले व तेथे आपल्या मित्रांना बोलावून घेतले. दुचाकीवरून आलेल्या संशयितानी खिशातील शिक्का काढून तो अदाबी यांना दाखवल्यानंतर त्यांची खात्री पटली व आणखी शिक्के हवे असल्यास शेतात यावे लागेल म्हणून कुर्‍हाकाकोडा शिवारातील शेतात नेले व तेथे अचानक मारहाण सुरू केली तसेच एकाने बॅग हिसकावली तर दुसर्‍याने खिशातील 30 हजारांची रोकड हिसकावून घेतली तर दुसर्‍या जबरीने हिसकावलेल्या एटीएमने पैसे काढण्याचा प्रयत्न केला मात्र खात्यात पैसे नसल्याने संशयितांनी कमरेच्या बेल्टने मारहाण करण्यास सुरूवात केली व नंतर संशयितांनी हायवेवर अदाबी यांना सोडून पळ काढला. हा प्रकार 21 रोजी रात्री ते 22 नोव्हेंबरदरम्यान मध्यरात्री घडला.

चौघे आरोपी अखेर जाळ्यात
तक्रारदार अदाबी महामार्गावर उभे असताना त्याचवेळी पोलिस वाहन आल्यानंतर त्यांनी घडला प्रकार कथन केला. मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक नागेश मोहिते व सहकार्‍यांनी तांत्रिक विश्लेषणाअंती आरोपी निष्पन्न केले. संशयित डिगंबर रमेश सोनवणे, परमेश्वर रघुनाथ भोलाणकर, महादेव आत्माराम भोलाणकर, अमोल संतोष घटे (सर्व रा.कुर्‍हाकाकोडा, ता.मुक्ताईनगर) या चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !