नाशिकमध्ये मद्यपींनी केला सेवानिवृत्त सैनिकाचा खून


A retired soldier was killed by drunkards in Nashik नाशिक  : गुन्हेगारीने शहरात डोकेवर काढले असून दोघा मद्यपींनी लूटमारी करताना सेवानिवृत्त सैनिकाच्या छातीत धारदार शस्त्र मारून खून केल्याची घटना सोमवारी म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. रवीदत्त राजेंद्र चौबे (47, मेट होस्टेल, निशांत गार्डन, धात्रकफाटा) असे मयताचे नाव आहे. म्हसरूळ पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे.

झटापटीत छातीत मारले शस्त्र
म्हसरूळ-आडगाव लिंकरोडवरील स्मशानभूमीजवळ दोघे संशयित मद्यपी रस्त्यावर उभे राहून धिंगाणा घालत होते. ये-जा करणारी वाहने अडवून त्यांना दमबाजी करत होते. याचवेळी चौबे यांनी कार रस्त्याच्या बाजूला उभी करून त्या संशयितांच्या दिशेने धाव घेतली असता अंधारात आरोपींनी धारधार शस्त्राने चौबे यांच्या छातीत भोसकले व घाव वर्मी बसल्याने रक्तबंबाळ अवस्थेत ते कोसळले. घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी अवस्थेत चौबे यांना पोलिस वाहनातून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मयत घोषित केले. मयत चौबे हे भारतीय वायुसेनेतून सेवानिवृत्त झाले होते व धात्रकफाटा येथे मुलामुलींच्या मेट वसतिगृहाचे मुख्य वॉर्डन म्हणून नोकरीला होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !