महापरीनिर्वाण दिनानिमित्त अमरावती-मुंबई अनारक्षित विशेष गाडी धावणार
Amravati-Mumbai unreserved special train will run on the occasion of Mahaparinirvana day भुसावळ : प्रवाशांची अतिरीक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे. विशेष गाडी अमरावती ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान चालविण्यात येईल.
असा आहे गाडीचा मार्ग
अमरावती- मुंबई अनारक्षित विशेष गाडी क्रमांक 01218 ही रविवार, 5 डिसेंबर रोजी अमरावती येथून 5.45 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसर्या दिवशी 5.25 वाजता पोहोचणार आहे. विशेष गाडी क्रमांक 01217 ही मंगळवार, 07 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 12.40 वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी 12.50 वाजता पोहोचेल. या गाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 14 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे जोडण्यात येतील. प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.








