दिड हजारांची लाच भोवली : लाचखोर भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक जाळ्यात
Half a thousand bribes in Bhovali : Bribery in land record office headquarters assistant net नाशिक : वडिलोपार्जीत शेतीची मोजणी करण्यासाठी तडजोडीअंती दिड हजारांची लाच घेताना चांदवड भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक अंजीनाथ बाबुराव रसाळ (50) यास नाशिक एसीबीने लाच घेताना अटक केली.
असे आहे लाच प्रकरण
30 वर्षीय तक्रारदार यांची वडिलोपार्जित शेती असून या शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी तारीख देण्याच्या मोबदल्यात 1 डिसेंबर रोजी रसाळ यांनी तीन हजार रुपये लाच मागितली मात्र दिड हजारात तडजोड झाल्यानंतर नाशिक एसीबीकडे तक्रार करण्यात आली. लाच स्वीकारताच रसाळ यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलिस निरीक परशुराम कांबळे, हवालदार प्रफुल्ल माळी, हवालदार सचिन गोसावी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
