जळगावातील अट्टल घरफोडे जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
सव्वा दोन लाखांचे दागिने जप्त : अनेक घरफोड्या उघडकीस येण्याची आशा
जळगाव : अट्टल घरफोडे मोहनसिंग जगदिशसिंग बावरी (18) व सोनूसिंग जगदिशसिंग बावरी (22 ,दोन्ही रा.तांबापुरा जळगाव) यांच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळत त्यांच्याकडून चोरीतील दोन लाख 24 हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम, हवालदार राजेश मेंढे, संजय हिवरकर, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी,सुनील दामोदरे, गफुर तडवी, महेश महाजन आदींनी आरोपींच्या चोरीचे सोने विकण्यापूर्वीच मुसक्या आवळल्या.



सोने मोडण्यापूर्वीच आरोपींना अटक
रविवारी मोहनसिंग जगदिशसिंग बावरी (18) व सोनूसिंग जगदिशसिंग बावरी (22) ही भावंडे चोरीतील सोने मोडण्यासाठी सराफ बाजारात आल्यानंतर त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींना सायंकाळी रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, शहरातील
महाबळमधील श्रीधर नगरातील उदय प्रल्हाद थोरात यांच्याकडे 5 जानेवारी 2020 च्या रात्री बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील तीन लाख 58 हजार 650 रुपयांचे दागिने लांबविले तर 21 जानेवारीच्या रात्री आदर्श नगरातील लायन्स क्लबजवळील उपकोषागार अधिकारी नसीम हमीद तडवी (52) यांच्याकडेही घरफोडी होऊन दीड लाखाचे दागिने लांबवण्याची घटना घडली होती. दोघा बावरी भावंडांनी ही चोरी केल्याचे सांगण्यात आले.

