जळगाव आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षकांचे निलंबन
जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने पोलिस वर्तुळात खळबळ
Suspension of Sub-Inspector of Police in Jalgaon Financial Offenses Branch भुसावळ : जळगाव आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक महेश घायतड यांचे जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी निलंबन केल्याने जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. बोदवड तालुक्यातील एका गुन्ह्याच्या तपासात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचे आल्याचे अधीक्षकांनी सांगितले.
आरोपी मोकाट : पोलिस अधीक्षकांची कारवाई
बोदवड तालुक्यातील एका प्रकरणाचा जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे मात्र या गुन्ह्यातील संशयिताविरोधात कारवाई करण्यात न आल्याने व तपासात निष्काळजीपणा करण्यात आल्याची बाब जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ प्रभावाने पोलिस उपनिरीक्षक महेश घायतड यांचे निलंबन केले आहे व नुकतेच याबाबतचे आदेश संबंधित अधिकार्यास बजावण्यात आले आहेत.


अधीक्षकांच्या कारवाईचा पोलिस अधिकार्यांना बसणार धसका
पोलिस दलाकडे शिस्तीचे खाते म्हणून पाहिले जाते मात्र अनेक गंभीर गुन्ह्यात पोलिस दलातील अधिकार्यांकडून संशयित आरोपींवर कारवाई करण्यात अनेकदा कसूर केला जात असल्याचा आरोपही केला जातो मात्र कर्तव्याला नेहमीच प्राधान्य देणार्या जिल्हा पोलिस अधीक्षकांनी खात्यातील उपनिरीक्षकास निलंबित केल्याने जिल्हा पोलिस दलातील अन्य अधिकार्यांना त्यातून संदेशही दिला गेला आहे.
कामात हलगर्जी केल्यास कारवाई निश्चित : जिल्हा पोलिस अधीक्षक
जळगाव आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक महेश घायतड यांना कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याने निलंबित केल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार म्हणाले. गुन्ह्याच्या तपासात पोलिस दलात अधिकारी वा कर्मचार्यांनी यापुढे निष्काळजीपणे केल्यास त्यांच्याविरोधात निश्चितपणे कारवाई होईलच, असेही ते म्हणाले.
