भुसावळातील शांती नगरात आठ दुकाने फोडली
चोरटे शिरजोर : व्यापारीवर्ग धास्तावला
भुसावळ : जुन्या चोर्यांचा तपास थंडबस्त्यात असतानाच नव्याने होणार्या चोर्या नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शहरातील गजबजलेल्या शांती नगर भागातील पुखराज प्लाझा संकुलातील तब्बल आठ दुकाने चोरट्यांनी फोडल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेने व्यापारीवर्ग धास्तावला आहे. प्रथमेश बेकर्स, दत्त डेअरी, पूर्वा कलेक्शन, पालवी फॅशन, एस.आर.फोटो या दुकानांचे शटर वाकवून तसेच काही दुकानांचे चोरट्यांनी कुलूप तोडत रोकडसह अन्य साहित्य लांबवले. पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली.
