वारकरी दिंडीत भरधाव कंटेनर शिरल्याने चौघा वारकर्यांचा मृत्यू
Four Warkaris died after a speeding container entered the Warkari Dindi संगमनेर : भरधाव कंटेनर वारकर्यांच्या दिंडीत शिरल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात चौघत्त वारकर्यांचा मृत्यू ओढवला. हा अपघात रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातून जाणार्या पठार भागातील नाशिक-पुणे महामार्गावर 19 मैल (खंदरमाळवाडी) परीसरात घडला. शिर्डीहून आळंदी येथे दिंडी घेवून वारकरी निघाले असताना त्यांच्यावर आघात कोसळला. दरम्यान. कंटेनर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
चौघांचा जागीच मृत्यू
या भीषण अपघातात ताराबाई गंगाधर गमे (52, रा.कोर्हाळे, ता.राहाता), भाऊसाहेब नाथा जपे (50, रा.कनकुरी, ता.राहाता), बबन पाटीलबा थोरे (65, रा.द्वारकानगर, शिर्डी, ता.राहाता), बाळासाहेब अर्जुन गवळी ( वय 50, रा. मढी, ता.कोपरगाव) यांचा जागीच मृत्यू ओढवला.


जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार
या अपघातात दिंडीतील वारकरी बिजलाबाई अशोक शिरोळे (55, रा.वाकडी, ता.राहता), राजेंद्र कारभारी सरोदे (55, रा.मढी, ता.कोपरगाव), भाऊसाहेब दशरथ गायकवाड (69, रा.वेस, ता.कोपरगाव), ओंकार नवनाथ चव्हाण (17, रा.मढी खुर्द, ता.कोपरगाव), निवृत्ती पुंजा डोंगरे (75, रा.पंचाळे, ता.सिन्नर, जि.नाशिक), शरद सचिन चापके (17, रा.परभणी), अंकुश ज्ञानेश्वर कराळे (35, रा.ज्ञानेश्वर मंदिर, शिर्डी), मीराबाई मारुती ढमाळे (60, रा.दुशिंगवाडी, वावी, ता. सिन्नर, जि.नाशिक) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
