महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरसह आदिलाबाद दरम्यान दोन विशेष गाड्या


भुसावळ  : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे दादर आणि आदिलाबाद दरम्यान दोन अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.

या स्थानकावर गाड्यांना थांबा
विशेष गाडी क्रमांक 07058 मंगळवार, 5 रोजी आदिलाबाद येथून सकाळी सात वाजता सुटेल आणि दादर येथे दुसर्‍या दिवशी दुपारी 3.30 वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक 07057 गुरुवार, 07 रोजी दादर येथून दुपारी 1.05 वाजता सुटेल आणि आदिलाबाद येथे त्याच दिवशी सायंकाळीत सात वाजता वाजता पोहोचेल. या गाडीला आदिलाबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, हुजूर साहेब नांदेड, पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासुर, रोटेगांव, नागरसोल, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण आणि दादर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह 14 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी योग्य तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !