भुसावळातील जवाहर नवोदय विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचा समारोप
भुसावळ : शहरातील जवाहर नवोदय विद्यालयात शनिवारी व रविवारी विभागीय सांस्कृतिक कार्यक्रम आणि कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. दोन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी झाला. दोन दिवशीय विभागीय सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्र, गोवा, गुजराथ, दीव-दमण, दादरा-नगर- हवेली येथील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
जळगाव महामार्गावरील जवाहर नवोदय विदयालयात शनिवार, रविवार असा दोन दिवस विभागीय सांस्कृतिक कार्यक्रम व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. शनिवारपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा रविवारी समारोप झाला. यावेळी नवोदय विद्यालय समिती सहाय्यक आयुक्त मेरी मनी, नागपूर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य कुरेशी, अकोला प्राचार्य चंदनशिव, बुलढाण्याचे आर.आर.कासार, जवाहर नवोदय विद्यालयाचे विजय अंभोरे आदी उपस्थित होते.


राज्यभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग
शनिवारी सकाळी नऊ वाजता कार्यक्रमास सुरूवात झाली. यात सर्वात प्रथम निबंध लेखन क्रियाकलापामध्ये रायगड, दमण, हिंगोली, अहमदाबाद, गोंदिया येथील जवाहर नवोदय विद्यालयातील 15 विद्यार्थी सहभागी झाले. वक्तृत्व स्पर्धेत हिंगोली, दमण, गोंदिया, रायगड, अहमदाबादमधील आठ विद्यार्थी सहभागी झाले होते. कविता गायनामध्ये जवाहर नवोदय विद्यालय दमण, हिंगोली, गोंदिया, अहमदाबाद येथील 11 विद्यार्थ्यांनी सहभाग नोदविला. विद्यार्थ्यांनी मिशन लाईफ एन्व्हायरमेंट, वसुधैव कुटुंबकम आदी विषयावर काव्यगायन केले. दमन, हिंगोली शाळेतील 16 विद्यार्थी क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये सहभागी झाले. जवाहर नवोदय विद्यालय, अहमदाबाद, गोंदिया, रायगड येथील एकूण 22 विद्यार्थी यांनी क्रियाकलपालमध्ये सहभाग घेतला होता. या संपूर्ण क्रियाकलापांचे परीक्षण येथील के.नारखेडे विद्यालयातील एस.टी.चौधरी, एस.टी.वासकर, एस.पी.पाठक यांनी केले.
यांची समारोपाला उपस्थिती
समारोपाच्या दुसर्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकार्यांचे स्वागत मेरी मनी यांनी केले, हर्षल पाटील, आमदार संजय सावकारे आदी मान्यवर उपस्थित होते. दुसर्या सत्रात समूहगीत, नाटक, समूह नृत्य आदींचा समावेश होता. क्रिया कलापांचे परीक्षण श्रीकांत जोशी, आनंद सपकाळे, धर्मराज देवकर या तज्ञ परीक्षकांनी केले. यावेळी बक्षीस समारंभ पार पडला. मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त शाळांना, विद्यार्थ्यांना तसेच सहभागी शिक्षकांनाही सर्टिफिकेट व पारीतोषिक देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन डॉ.संजय मराठे, बलराम दिवेदी, अजय धारणे यांनी तर आभार जवाहर नवोदय विद्यालय नागपूरचे प्राचार्या कुरेशी यांनी मानले.





