दीपनगर प्रकल्पातील दोघे सुरक्षा रक्षक दगडफेकीत जखमी : चौघा हल्लेखोरांविरोधात गुन्हा
Two security guards injured in stone pelting in Deepnagar project : Crime against four assailants भुसावळ : दीपपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील 20 हजारांचे लोखंडी साईड डोअर तसेच दोन मोबाईल लांबवण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून चौकडीने केलल्या दगडफेकीत दोन सुरक्षा रक्षकही जखमी झाले. याप्रकरणी अनोळी चौघा हल्लेखोरांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दगडफेकीत दोघे सुरक्षा रक्षक जखमी
बुधवार, 6 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर सव्वा दोन ते पावणे तीन वाजेच्या सुमारास फेकरी रेल्वे क्रॉसिंगनजीक दीपनगर प्लांट कडून भुसावळच्या दिशेने जाणार्या एम.टी.रॅकमध्ये अज्ञात चोरट्यांनी दीपनगर सीएचपी प्लांट परीसरातून 20 हजार रुपये किंमतीचे नऊ लोखंडी साईट डोअर चोरी करून आणले होते. त्या चोरीच्या लोखंडी 9 डोअरकडे वीज केंद्राचे कनिष्ठ सुरक्षा अधिकारी अनिकेत चंद्रकांत काणेकर यांचे लक्ष गेल्यानंतर त्यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने ते डोअर त्यांच्या ताब्यातील वाहनात लोड करू लागताच लाल-काळ्या रंगाच्या विना क्रमांकची पल्सरने अनोळखी आला व त्याने पाहणी केली व त्यानंतर तिघांनी अंधारात सुरक्षा अधिकारी अनिकेत कानेकर व त्यांच्या साथीदारांवर दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत दिलीप वना वराडे व राजेंद्र घनश्याम पाटील या दोघांचे मोबाईल हिसकावले तसेच महेंद्रा वाहन (एम.एच.19 सी.वाय.5016) चे काच फोडले. याप्रकरणी चौघा अनोळखी विरुद्ध भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक पूजा अंधारे करत आहेत.


