बोदवड परिसर सिंचन योजनेच्या टप्पा-1 च्या कामांसाठी 278 कोटी 62 लाखांच्या निधीला केंद्राची मान्यता

बोदवड, जामनेर आणी मुक्ताईनगर तालुक्यातील लाभक्षेत्राला होणार फायदा


Center approves funds of 278 crores 62 lakhs for Phase-I works of Bodwad Area Irrigation Scheme
भुसावळ :
केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील बोदवड परिसर सिंचन योजनेच्या टप्पा-1 च्या कामांसाठी 278 कोटी 62 लाखांचा निधीला मान्यता मिळाली आहे. या योजनेमुळे जळगाव जिल्ह्यातील बोदवड, जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील आठ हजार 477 हेक्टर लाभक्षेत्र सुजलाम सुफलाम होणार आहे.

योजनेचे काम लागणार मार्गी
जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यातील 53 हजार 449 हेक्टर क्षेत्रासाठी संजीवनी ठरणार्‍या बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेतील टप्पा-1 मधील कामाला केंद्राने उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळे या योजनेचे काम आता गतीने मार्गी लागणार आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्र शासनाच्या सार्वजनिक गुंतवणुक मंडळाच्या बैठकित तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत वेगवर्धीत सिंचन योजनेत या निधीला मान्यता प्राप्त झाली आहे.


2141.19 कोटींची योजना
या योजनेच्या टप्पा-1 ची एकूण किंमत दोन हजार 141.19 कोटी आहे. कामाप्रित्यर्थ किंमत एक हजार 923.81 कोटी एवढी आहे. या योजनेचा समावेश प्रधानमंत्री कृषी सहाय्य योजने अंतर्गत वेगवर्धीत सिंचन योजनेत झाल्याने या टप्यातर्गत विदर्भातील सहा हजार 167 हेक्टर व अवर्षण प्रवण भागातील नऊ हजार 507 हेक्टर तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील सहा हजार 546 हेक्टर अशा बुलढाणा जिल्ह्यातील 13 हजार 743 हेक्टर व जळगाव जिल्ह्यातील आठ हजार 477 हेक्टर अशा एकूण 22 हजार 220 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा फायदा मिळणार आहे.

तीन वर्षात् 278.62 कोटी मिळणार
मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार या कामाची उर्वरीत किंमत 694.87 कोटी आहे. त्यापैकी रु.278.62 कोटी येत्या तीन वर्षात केंद्र शासनामार्फत प्राप्त होणार असून उर्वरीत 416.25 कोटी राज्य शासनामार्फत खर्च करण्यात येणार आहेत.

आमदार-खासदारांच्या पाठपुराव्याला यश
बोदवड परीसर सिंचन योजना कामाचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सहाय्य योजने अंतर्गत वेगवर्धीत सिंचन योजनेत करण्याकामी रावेर मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनानुसार या प्रस्तावाबाबत तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक ज.द.बोरकर, अधीक्षक अभियंता य. का. भदाणे, कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन व कार्यकारी अभियंता उ.दे. दाभाडे यांनी सुधारीत प्रशासकीय मान्यता केंद्र शासन गुंतवणूक मान्यता, राज्य शासन गुंतवणूक मान्यता अशा विविध संविधानीक मान्यता प्राप्त करून केंद्र शासनाकडे सदर प्रकल्प पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेत समाविष्ठ होणेसाठी अथक प्रयत्न व सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. यासाठी प्रस्तावाच्या सद्यस्थिती व कार्यवाहीबाबत केंद्र व राज्य शासनाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून समन्वय ठेवण्याची महत्त्वाची भूमिका जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पार पडली. या सर्व एकत्रीत प्रयत्नामुळे बोदवड सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील निधीचे काम मार्गी लागले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !