जळगावातील कुविख्यात गुन्हेगार नागपूर कारागृहात स्थानबद्ध


Notorious criminals from Jalgaon lodged in Nagpur Jail जळगाव : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍यांविरोधात जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या नेतृत्वात पोलिस दलातर्फे धडक कारवाईंचा सपाटा सुरू असून यापूर्वी अनेक टोळ्यांसह गुन्हेगारांवर हद्दपारी तसेच एमपीडीएची कारवाई झाल्यानंतर पुन्हा जळगावातील एका गुन्हेगारावर स्थानबद्धतेची (एमपीडीए) कारवाई झाल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. ललित उमाकांत दिक्षीत (28, प्लॉट नंबर सात, ईश्वर कॉलनी, जळगाव) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी : तब्बल आठ गुन्हे
जळगावच्या ईश्वर कॉलनी भागातील रहिवासी गुन्हेगार ललित दिक्षीत याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. जबरी लूट, दंगल यासह विविध गंभीर स्वरूपाच्यात गुन्ह्यात त्यात समावेश आहे. ललित दिक्षीतयाच्याविरुद्ध चारवेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्यानंतरही त्याच्या वर्तुणुकीत सुधारणा होत नसल्याने एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक किसनराव नजनपाटील, सहायक फौजदार युनूस शेख, हवालदार सुनील दामोदरे, हवालदार जयंत चौधरी, ईश्वर पाटील आदींनी या प्रस्तावाला मूर्त स्वरुप दिल्यानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला व जिल्हाधिकार्‍यांनी संशयिताच्या स्थानबद्धतेचे आदेश पारीत केले.



ललित दिक्षीत नागपूरात स्थानबद्ध
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, किशोर पाटील, छगन तायडे, किरण पाटील, साईनाथ मुंडे, राहुल रगडे, विशाल कोळी आदींनी ललित दिक्षीत यास मध्यवर्ती कारागृह नागपूरात स्थानबद्ध केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !