पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाला पुरवली माहिती : मूळ जळगाव रहिवासी तरुणाला बेड्या
Information provided to the intelligence department of Pakistan : Native Jalgaon youth shackled
मुंबई ठाण्यातील रहिवासी व मात्र मूळचा जळगावकर असलेल्या गौरव पाटील (23) या तरुणाने पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाला भारतातील प्रतिबंधीत क्षेत्रातील माहिती दिल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. माहितीच्या बदल्यात तरुणाने पैसे स्वीकारल्याचे स्पष्ट झाले असून गौरवसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेसबुकद्वारे दिली माहिती
पाकिस्तानी गुप्तहेराला प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पुरवल्याबद्दल ठाण्यातून गौरवला अटक करण्यात आली. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने काल ही धडक कारवाई केली. या तरूणाने नेव्हल डॉक यार्डमध्ये कार्यरत असता एप्रिल-मे ते ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानी गुप्तहेराच्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर माहिती पुरवल्यानंतर कारवाई करण्यात आली. गौरव पाटील याला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


हनी ट्रॅपचा संशय
या प्रकरणी अजून तीन जणांची भूमिका संशयास्पद आढळून आल्याने एटीएसने गौरव पाटील याच्यासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात गौरव पाटलासह इतरांना हनी ट्रॅपमध्ये अडकावून त्यांच्याकडून पाकच्या गुप्तचर यंत्रणेने माहिती मिळवल्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली असून या दिशेने चौकशी सुरू आहे.
