भुसावळात एनआरसी एनपीआर विरोधात आकाशात काळे फुगे सोडून निषेध
भुसावळ : एनआरसी एनपीआर कायद्याविरोधात भुसावळातील संविधान बचावो समितीतर्फे भुसावळ कार्यालयाबाहेर साखळी उपोषण सुरू असून सोमवारी या कायद्याच्या निषेधार्थ आकाशात काळे फुगे सोडून निषेध करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी मौलाना सुलतान रजा, मौलाना सदाम, फारुक देशमुख, अमीर खा (सावदा), अजगर शाह, भुराभाई सपकाळे, मल्हार खैरनार, ईब्राहीम खान उर्फ राजा, सोएब, अरब भाई, संविधान बचावो समितीचे पदाधिकारी सलीमशेठ चुडलीवाले, मो.मुन्वर खान, साबीर मेंम्बर, दानीस पटेल, अशरफ कुरेशी, अजहर भाई मजहर भाई, फरान भाई, ईम्रान खान, युनुस मामा, जुनेद खान यांच्यासह संविधान बचावो समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, काळ्या फुग्यांवर एनआरसी, एनपीआर व सीएए रीजेक्ट करण्याबाबत मजकुरही लिहिण्यात आला होता. प्रसंगी फैजपूरच्या पदाधिकार्यांच्या पाठिंब्याचे पत्र भुसावळ तहसील प्रशासनाला देण्यात आले.



