सावदा नगरपालिकेच्या कार्यालय अधीक्षकांना मारहाण


Office superintendent of Savada municipality beaten up सावदा : सावदा नगरपालिकेचे कार्यालय अधीक्षक यांना त्यांच्या कक्षातच एकाने मारहाण करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडल्याने नगरपालिका कार्यालयात एकच खळबळ उडाली.

उत्तर देताच केली मारहाण
सावदा नगरपालिकेचे अधीक्षक सचिन हौशीराम चोळके (31, गांधी चौक, सावदा) यांनी सावदा पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी सायंकाळी ते आपल्या दालनात बसलेले असताना संशयित आकाश दीपक गोयर (मेहतर कॉलनी, सावदा) हा तेथे आला व त्याने सावदा पालिकेचे सफाचे कामाचे बिल मंजूर केले वा नाही? अशी विचारणा केल्यानंतर चोळके यांनी या कामाचा ठेका त्रयस्थ संस्थेला दिल्याने तुम्ही त्यांना जावून विचारणा करा, असे सांगितल्याने त्याचा राग येवून संशयित गोयर याने चोळके लिहित असलेले कार्यालयीन कागदपत्रे हातातून हिसकावून फाडून फेकले तसेच शिविगाळ करीत सदरचा ठेका तुम्ही का त्यास दिला म्हणून चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली व पाहून घेण्याची धमकी दिली.



त्यानंतर युवक पसार झाला. याबाबत लागलीच कार्यालय अधीक्षक सचिन चोळके व सर्व नगरपालिका कर्मचारी यांनी सावदा पोलिस ठाणे गाठत संशयिताविरोधात तक्रार नोंदवली. तपास सावदा सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !