रावेर लोकसभा अंतर्गत विविध स्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा हवा

खासदार रक्षा खडसे यांचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन


Express trains have stops at various stations under Raver Lok Sabha भुसावळ : रावेर लोकसभा अंतर्गत नांदुरा, मलकापूर, बोडवड, निंभोरा, रावेर व भुसावळ रेल्वे स्टेशनवर विविध एक्सप्रेस गाड्यांचा थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे दिल्लीतील हिवाळी अधिवेशना दरम्यान भेट घेऊन केली.

सकारात्मक दखल घेण्याचे आश्वासन
बोदवडला नवजीवन एक्सप्रेस 12655-12656, सुरत-अमरावती एक्सप्रेस 20925/20926, आझाद हिंद एक्सप्रेस 12129/12130 तर नांदुरा रेल्वे स्थानकावर जयपूर-हैद्राबाद डेक्कन एक्सप्रेस 12719/12720, प्रेरणा एक्सप्रेस 22137/22138, नागपूर-पुणे गरीबरथ 12113/12114, रावेरला महानगरी सुपरफास्ट एक्स्प्रेस 22177/22178, निंभोरा येथे अमृतसर-पुणे एक्सप्रेस 11057/11058 तसेच भुसावळ रेल्वे स्थानकावर राजधानी एक्सप्रेसला 22221/2222 टेक्निकल हाल्ट द्यावा व मलकापूर येथे पुणे-अमरावती एक्सप्रेस 22117/22118, नागपूर-पुणे गरीबरथ 12113/12114 या रेल्वे गाड्यांना थांबा मिळण्याची मागणी करण्यात आली. मागणी संदर्भात सकारात्मक दखल घेण्याचे आश्वास यावेळी देण्यात आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !