फैजपूर भाजपाच्या शहराध्यक्षपदी अनंता नेहेते


फैजपूर : भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी अनंता भालचंद्र नेहते यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. शहराध्यक्ष पदासाठी संजय रल, संजय सराफ, राजू चौधरी, नरेंद्र चौधरी व अनंता नेहेते इच्छूक होते. यातून संजय रल, संजय सराफ, राजू चौधरी व नरेंद्र चौधरी यांनी माघार घेतल्याने अनंता भालचंद्र नेहेते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. फैजपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दुपारी तीन वाजता शहराची बैठक झाली. स्व.पंडित दीनदयाल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

यांची बैठकीला उपस्थिती
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदार हरीभाऊ जावळे, माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, नगराध्यक्ष महानंदा होले, माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघूळदे, निलेश राणे, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, माजी सभापती भरत महाजन, माजी नगरसेवक संजय महाजन, माजी मसाका संचालक नितीन राणे, शेतकरी संघ उपसभापती नितीन नेमाडे, उमेश पाटील, जितेंद्र भारंबे, रवींद्र होले, महिला आघाडी शहराध्यक्ष जयश्री चौधरी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !