धरणगावात राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य करीत घोषणाबाजी : 11 संशयितांविरोधात गुन्हा


Slogan raising in Dharangaon against national unity : Crime against 11 suspects धरणगाव  : हमास दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे नेमके प्रकरण
धरणगावातील अमोल सखाराम महाजन यांनी धरणगाव पोलिसात य प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, 8 नोव्हेंबर रोजी हाजी रफिक कुरेशी फाउंडेशन धरणगाव या मुस्लीम संघटनेतर्फे जुलुस ए गौसीया या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी त्यांनी पोलिस प्रशासनाची परवानगी घेतली होती. ही मिरवणूक दुपारी तीन वाजेच्या सुमारास काढण्यात आली. या मिरवणुकीत अडीच ते तीन हजर लोक सहभागी झाले. मिरवणूक जैन गल्ली व बाजारपेठ धरणगाव या ठिकाणी असतांना, मिरवणुकीतील काही जणांनी हमास या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ तसेच इतरही वादग्रस्त घोषणा दिल्यात. हमास या दहशतवादी संघटनेचे झेंडे फडकविले.



झेंडेही फडकवले
यावेळी स्वतः हजर असल्याने माझ्या मोबाईलमध्ये घोषणांची ऑडीओ, व्हीडीओ शुटींग केली असल्याचे अमोल महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. जुलुसमधील काही इसमांच्या हातात स्टीलचे रॉड होते. तसेच त्यांच्या हातात पॅलेस्टीन व हमास तसेच इतर झेंडे होते. संबंधितांनी भारताच्या एकतेला व अखंडतेला बाधा निर्माण होईल व दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल, या उद्देशाने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला असल्याचेही महाजन यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी भादंवि कलम 153 (1) (ल) 188 प्रमाणे शेख रफिक शेख मुसा करेशी, इरफान शेख अरमान, मोहंमद इस्राइल युसुफ, नगर मोमीन, नदीमोदीन एजाजोद्दीन काझी, कालु उस्ताद, मोहंमद सलीम मोहंमद इसाक मोमीन, इब्राहीम जनाब उर्फ इत्तुजनाव, अमजदखान गुलाब खान बेलदार, मो. अयास मो, सिद्दीकी, जुनेद खान पुर्ण नाव माहीत नाही (सर्व रा.धरणगाव) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !