शिवजयंती महावकृत्व स्पर्धेला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


अंतर्नाद प्रतिष्ठान व शिक्षण विभागातर्फे आयोजन : 270 स्पर्धकांची उपस्थिती

भुसावळ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार बालकांच्या मनावर रुजावेत या हेतुने अंतर्नाद प्रतिष्ठान व शिक्षण विभाग पंचायत समिती भुसावळ यांच्यातर्फे सोमवारी वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यात शहरातील 30 शाळेतील 270 स्पर्धकांनी सहभाग घेतला.त्यांनी वकृत्वातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची थोरवी कथन केली. म्युन्सीपल हायस्कूलमध्ये ही स्पर्धा झाली. प्रारंभी नगरपालिका शिक्षण सभापती मुकेश पाटील, गटशिक्षण अधिकारी तुषार प्रधान, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अधिव्याख्याता शैलेश पाटील, अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघ अध्यक्ष रघुनाथ सोनवणे, मुख्याध्यापक बी.वाय सोनवणे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. अथर्व इंगळ ेया चिमुकल्याच्या ओघवत्या भाषणाने स्पर्धेची सुरवात करण्यात आली.

चार गटात झाली स्पर्धा
प्रथमच शिक्षकांसाठी सुध्दा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा चार गटात गटात पार पडली. जिजाऊंचा शिवबा, छत्रपती शिवरायांचे बालपण, शिवराज्याभिषेक या विषयावर तिसरी व चौथीच्या पहिल्या गटाच्या माध्यमातून वकृत्व सादर केले. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे स्वामिनिष्ठ मावळे, छत्रपती शिवाजी महाराजांची गुणवैशिष्ट्ये, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर पाचवी ते सातवीच्या स्पर्धकांनी दुसर्‍या गटाच्या माध्यमातून शिवरायांची थोरवी कथन केली.उत्तम प्रशासक छत्रपती शिवाजी महाराज, गडकोट किल्ले व छत्रपती शिवाजी महाराज, मी छत्रपती शिवाजी महाराज भोसले बोलतोय या विषयावर आठवी ते दहावीच्या स्पर्धकांनी तिसर्‍या गटाच्या माध्यमातून वकृत्व सादर केले तर शिक्षकांच्या चौथ्या गटात बाल शिवाजी घडविण्यात आजच्या शिक्षकाची भूमिका, 21 व्या शतकात शिवाजी महाराज अवतरले तर, जिजाऊंचे बाळकडू आधुनिक काळाची गरज, शिवराय नक्की कोणाचे?, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर वकृत्व सादर झाले.




प्रत्येक वर्गात तीन परीक्षकांनी केले परीक्षण
30 स्पर्धकांचा एक वर्ग याप्रमाणे 10 वर्ग करण्यात आले. प्रत्येक वर्गात तिन परीक्षकानी परीक्षण केले. सभाधीटपणा, विषय मांडणी, हावभाव, आवाजातील चढ-उतार आणि परीणामकारकता यावर आधारीत परिक्षण करण्यात आले. तीन परीक्षकांचे गुण एकत्र करून प्रत्येक वर्गातील प्रथम तीन विजेते काढण्यात येणार आहे. या सर्व विजेत्यांची अंतिम फेरी बक्षीस वितरणाच्या दिवशी घेण्यात येणार आहे. नंतर तेथेच प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम व शिव चरीत्र देउन गौरवण्यात येणार आहे. बक्षीस वितरणाची दिनांक आणि ठिकाण सबंधित शाळा आणि स्पर्धकांना वैयक्तीक फोन करून कळवण्यात येणार आहे.

यांनी घेतले परीश्रम
स्पर्धा प्रकल्प प्रमुख जीवन महाजन यांनी प्रास्ताविक तर स्पर्धा सह समन्वयक समाधान जाधव यांनी स्पर्धेची माहिती दिली. सूत्रसंचालन योगेश इंगळे यांनी तर आभार समन्वयक हेमांगिनी चौधरी यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, ज्ञानेश्वर घुले, प्रदीप सोनवणे, प्रभाकर नेहते, अमित चौधरी, तेजेंद्र महाजन, देव सरकटे, भूषण झोपे, डॉ.जगदीश पाटील, गणेश फेगडे, शिरीष कोल्हे, अलका भटकर, ललित धांडे, आर.आर.धनगर, नलिनी वानखेडे, हरीश कोल्हे, सचिन पाटील, ईश्वर पवार, किरण पाटील, योगेश जाधव, रुपेश पाटील, कृष्णा शिंदे, मा.शा.पाटील, ए.जे.पाटील, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील आदींनी परीश्रम घेतले.

30 परीक्षकांनी केले परीक्षण
प्रा.जे.एफ.पाटील, प्र.ह.दलाल, डॉ.दिनेश महाजन, सुनील वानखेडे, सतीश कुलकर्णी, अमितकुमार पाटील, प्रसन्ना बोरोले, ललित फिरके, नामदेव महाजन, नाना पाटील, हेमलता चौधरी, अनिल देशपांडे, सोनाली वासकर, शैलेंद्र वासकर, शैलेंद्र महाजन, विक्रांत चौधरी, अर्चना शर्मा, जीवन सपकाळे, ऋषिकेश पवार, आनंदा सपकाळे, समीर तडवी, वंदना भिरुड, प्रमोद आठवले, रवींद्र पाटील, शाम दुसाने, प्रशांत पाटील, दीपक पाटील, पी.जे.चौधरी, दिनकर जावळे, रीता शर्मा आदींनी परीक्षण केले.

स्पर्धेचा हेतु साध्य
अंतर्नाद प्रतिष्ठान आणि शिक्षण विभाग यांनी सलग तिसर्‍या वर्षी हा उपक्रम राबविला असुन सदर स्पर्धेच्या माध्यमातून शिवरायांचे विचार बालमनावर पेरण्याचे काम होत असुन सद्य परीस्थितीत ते फार महत्वाचे आहे. हा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे. भविष्यात या उपक्रमाला अधिक व्यापक स्वरुप देण्याची गरज आहे, असे पालिका सभापती मुकेश पाटील यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !