जामनेरजवळ कंटेनर-कारमध्ये भीषण अपघात : कार चालकासह तिघे जागीच ठार
Fatal accident in container-car near Jamner : Three killed on the spot including the car driver जामनेर : भरधाव कंटेनरने चारचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालकासह तिघे ठार झाले. मृतांमध्ये पैठणच्या दोघांचा तर एमपीतील एकाचा समावेश आहे. मुक्ताईनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले. अल्लाउद्दीन गयासोद्दीन शेख (40), शेख समीर शेख नजीर (20, दोघे रा. बालानगर, ता.पैठण) व वाहनचालक साजन जगन बडोले (25,
रा. खंडवा, मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.


अपघातानंतर टँकर चालक पसार
बालानगर येथून फळांच्या खरेदीसाठी खंडव्याकडे कार चालकासह तिघे कारने निघाल्यानंतर जामनेर येथील रेल्वे गेट व टाकळी गावाच्या मध्ये असलेल्या नागदेवता मंदिराजवळील वळणावर सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास भरधाव टँकर (आर.जे.32 जी.सी.0789) ने जबर धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर टँकर चालक मात्र पसार झाला.
