पोलिस दप्तरी 13 गुन्हे ; दोन वेळा हद्दपारी, एमपीडीए झालेला कुविख्यात गुन्हेगार चाळीसगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात


चाळीसगाव : शहरातील छाजेड ऑईल मिलच्या मागे झालेल्या वादानंतर टोळी प्रमुखाने चॉपरने हल्ला चढवला होता. तब्बल वर्षभरानंतर संशयिताचा शोध लागला असून मंगळवारी त्यास गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अटक करण्यात आली. हैदर अली आसिफ अली (चाळीसगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

विचारणा केल्याच्या रागातून केला होता हल्ला
18 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 9 वाजता आण्णा कोळी यांच्या घरासमोर संशयित हैदर अली आसीफ अली, नदीम खान साबिर खान उर्फ गोल्डन, सुलतान शेख रहेमान शेख, वाजिद खान साबीर खान, शेख नवाज शेख सलीम व इतर दोन अनोळखी इसमांनी एकत्रीत येवून तक्रारदार वैभव अरुण रोकडे (24) यांना मारहाण का केली म्हणून विचारणा केल्याच्या वादातून लाकडी दांडके व चॉपरने डोक्यात व साक्षीदाराच्या मांडीवर घाव घालून गंभीर दुखापत केली होती. या गुन्ह्यातील टोळी प्रमुख हैदर अली आसिफ अली हा पसार होता मात्र त्यास मंगळवारी त्यास गोपनीय माहितीवरून अटक करण्यात आली.



यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहा.पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहरचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड , महेंद्र पाटील, भूषण पाटील, विजय पाटील, अमोल भोसले, पवन पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे, प्रकाश पाटील, महिला हवालदार विमल सानप आदींच्या पथकाने केली.

आरोपी कुविख्यात : 13 गुन्हे दाखल
हैदर अली आसिफ अली विरोधात शरीराविरुध्दचे 11, मालाविरुध्दचा एक, महिला अत्याराराचा एक असे एकूण 13 गुन्हे दाखल आहेत शिवाय दोन वेळा हद्दपार तसेच एक वेळा एमपीडीची कारवाईदेखील त्याच्यावर करण्यात आली आहे. तपास सहाय्यक निरीक्षक दीपक बिरारी, हवालदार विनोद भोई, प्रकाश पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !