जळगावात सव्वादोन लाखांची प्रतिबंधीत सुगंधी सुपारी जप्त
गुन्हे शाखेसह शहर पोलिसांची संयुक्त कारवाई : एकाविरोधात गुन्हा
Prohibited aromatic betel nuts worth 1.52 lakh seized in Jalgaon जळगाव जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व जळगाव शहर पोलिसांनी संयुक्त कारवाईत राज्यात प्रतिबंधीत असलेली तब्बल 15 पोते सुगंधी तंबाखू बळीराम पेठ येथील जळगाव फ्रेंडस ट्रान्सपोर्ट दुकानातून जप्त केली. ही कारवाई मंगळवार, 19 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता करण्यात आली. दोन लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलिसात विक्रेता दीपक महाराजसिंग यादव (42, रा.रोहणवाडी, जळगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील बळीरामपेठ परीसरातील जळगाव फ्रेंडस ट्रान्सपोर्ट दुकानात सुगंधित पान मसाला विक्री होत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, विजय पाटील यांना मिळाल्यानंतर शहर पोलिसांना घेत पथकाने मंगळवारी दुपारी दोन वाजता दुकानातून सुगंधित पान मसाल्याचा दोन लाख 25 हजारांचा साठा जप्त केला. याप्रकरणी हवालदार राजकुमार चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विक्रेता दीपक महाराजसिंग यादव (42, रा.रोहणवाडी, जळगाव) याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.


