भरधाव टँकरने चिरडल्याने विटनेरच्या शेतकर्‍याचा मृत्यू

संतप्त ग्रामस्थांचा चक्काजाम : वाहनांची झाली कोंडी


Vitner farmer dies after being crushed by speeding tanker जळगाव : शेतशिवारातून म्हशी घरी आणत असताना भरधाव टँकरने धडक दिल्याने शेतकरी सुकलाल पंडित सोनवणे यांच्यासह म्हशीचा जागीच मृत्यू झाला. विटनेर येथे नेरीकडून म्हसावदकडे जाणार्‍या रस्त्यावर हा अपघात ा मंगळवार, 19 रोजी दुपारी घडली.

ग्रामस्थांनी केला रस्तारोको
केमिकल घेवून जाणारा टँकर (क्र.जी.जे.12 बी.व्ही. 7475) भरधाव वेगाने येत असताना म्हशीसह शेतकर्‍याला धडक दिली. या अपघातात सुकलाल पंडित यांच्यासह म्हैशीचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बैठे आंदोलनाला सुरुवात केली. त्यामुळे हा मार्ग तब्बल तीन तास ठप्प होवून वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. विटनेर गावात मोठ्या प्रमाणात पशुपालक राहतात. दुसरीकडे परिसरात नेहमी भरधाव वेगाने वाहन धावत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळते, अशा तक्रारीचा सूर ग्रामस्थांनी लावला. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



एमआयडीसी पोलिसांनी अपघात ठिकाणी जावून शेतकर्‍याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. ग्रामस्थांची समजूत घातल्यानंतर वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी चालकाविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !