पिंपळनेरचा लाचखोर तलाठी धुळे एसीबीच्या जाळ्यात


सातबारा उतार्‍यावर बोजा चढवण्यासाठी एक हजाराची लाच घेताना अटक

पिंपळनेर : सातबारा उतार्‍यावर बोजा चढवण्यासाठी एक हजाराची लाच घेताना पिंपळनेर तलाठी शरद जगन्नाथ कोठावदे (56 रा.पिंपळनेर, डॉ.शिंदे यांच्या घराजवळ, नवापुर रोड, पिंपळनेर) यास मंगळवारी दुपारी धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

यांनी यशस्वी केला सापळा
पिंपळनेरातील तक्रारदाराच्या पीक कर्ज प्रकरणात सात-बारा उतार्‍यावर बोजा बसवण्यासाठी आरोपी तलाठ्याने तडजोडीअंती एक हजार रुपये लाचेची मागणी 11 फेब्रुवारी रोजी केल्याने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली होती. धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलिस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण व प्रकाश झोडगे, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले , प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर, सुधीर मोरे आदींच्या पथकाने आरोपीने लाच स्वीकारताच अटक केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !