सरकारचा मोठा निर्णय : अयोध्येतील सर्व हॉटेल आणि धर्मशाळांचे प्री-बुकिंग रद्द


Government’s big decision: Cancel pre-booking of all hotels and Dharamshalas in Ayodhya नवी दिल्ली : संपूर्ण जगभराचे लक्ष लागून असलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिर उद्घाटनाची तारीख जस-जशी जवळ येत आहे तस-तशी उत्कंठाही वाढू लागली आहे. राज्य सरकारने 22 जानेवारीला अयोध्येतील सर्व हॉटेल आणि धर्मशाळांचे प्री-बुकिंग रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आहे. व्हीआयपींची सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वीचे सर्व बुकींग रद्द होणार
मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी 22 जानेवारी रोजी हॉटेल आणि धर्मशाळांमध्ये आधीच केलेले बुकिंग रद्द केले जाणार आहे. गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. 22 जानेवारीला लोकांनी अयोध्येत आधीच मोठ्या प्रमाणात हॉटेल्स बुक केली आहेत. पण ती रद्द केली जातील. व्हीआयपी सुरक्षेचा विचार करून हे बुकिंग रद्द केले जाईल. 22 जानेवारीला केवळ तेच लोक अयोध्येत राहू शकतील, ज्यांच्याकडे ड्युटी पास किंवा श्री रामतीर्थ ट्रस्टचे निमंत्रण पत्र असेल.






शंभरावर विमाने दाखल होणार
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, भारतातून विशेष निमंत्रित अयोध्येत येणार आहेत. अयोध्या विमानतळावर 100 विमाने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर सेवांचा विचार करून त्याची योग्य व्यवस्था लावावी.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !