मुक्ताईनगरात पोलिस अधीक्षकांकडून सभास्थळासह हेलिपॅडची पाहणी


मुक्ताईनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगरातील एस.एम.कॉलेजलगतच्या प्रशस्त आठ एकराच्या मैदानावर शनिवार, 15 रोजी शेतकरी मेळावा होत असून या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून दौर्‍याच्या अनुषंगाने बंदोबस्ताचा आढावा घेतला जात आहे. मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले तसेच उपजिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांनी सभास्थळासह हेलिपॅडची पाहणी केली. या मेळाव्यास राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार कृषी मंत्री दादासाहेब भुसे, दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

यांची होती उपस्थिती
पाहणीप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार शाम वाडकर, पोलिस उपविभागीय अधिकारी सुरेश जाधव, पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नेहते तसेच कर्मचारी शिंदे व शेजोळे, वीज वितरण कंपनीचे उप अभियंता मनोज चौधरी, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, तालुका प्रमुख छोटू भोई, जिल्हा नियोजन समिती सदस्य अ‍ॅड.मनोहर खैरनार यांच्यासह असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !