मनोज जरांगेंचे ठरले : मुंबईच्या आझाद मैदानावर 20 पासून आमरण उपोषण : तीन कोटी समाजबांधव येणार


बीड : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणासाठी पुन्हा सरकारला इशारा दिला असून आता 20 जानेवारपासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे शिवाय या आंदोलनात तीन कोटी मराठा समाजबांधव सहभागी होणार असल्याचा दावा करीत त्यांना आडवून दाखवा असा इशाराही दिला आहे.

निर्णायक सभेत दिला इशारा
मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. सरकारला दिलेली मुदत 24 डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी 23 डिसेंबरला बीडमध्ये जरांगे-पाटील यांची बीडमध्ये निर्णायक इशारा सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. आमच्या मराठ्यांच्या लेकरांना खोटे गुन्हे दाखल करून अडकवले. हे सरकारचे षडयंत्र आहे. लेकरांचे मुडदे पडत असताना सरकार हसत आहे. याच्या खुप वेदना होतात. तसेच आरक्षणासाठी सरकारने सुरूवातीला तीन महिने, 40 दिवस नंतर आता 24 डिसेंबरपर्यंत वेळ मागितला. परंतू काहीच निर्णय घेतला नाही. मग आम्ही कुठपर्यंत थांबणार? आम्हालाही मर्यादा आहेत. परंतू आता सहनशिलता संपली आहे. त्यामुळे तयारीला लागा. 20 जानेवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करत आहे. मला भेटायला राज्यातील तीन कोटी मराठे येणार आहेत, त्यांना अडवून दाखवा? असे म्हणत सरकाला इशारा दिला आहे. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत माघारी येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.




 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !