पालमध्ये 19 वर्षीय युवतीची आत्महत्या
रावेर : तालुक्यातील पाल येथे एका 19 वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पाल येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास अंकिता सुपूडू बाविस्कर (19) या युवतीने कुठल्यातरी कारणावरून गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याबाबत रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
कॉपीच्या तणावातून आत्महत्या ?
दरम्यान, अंकितावर जळगाव विद्यापीठाने कॉपीचा ठपका ठेवला होता व या ठपक्यातून आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.



