भुसावळ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव : कुर्‍हेपानाचे गावातील रुग्णाला कोरोनाची लागण


Entry of Corona in Bhusawal Taluka : A patient from Kurhepanache village is infected with Corona भुसावळ : सुमारे अडीच वर्षानंतर जिल्ह्यात कोरोनाने डोके वर काढले असून भुसावळ तालुक्यातील कुर्‍हेपानाचे गावातील एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर नागरीकांनी सुटकेचा श्वास घेतला होता मात्र कुर्‍हेपानाचे येथील 43 वर्षीय प्रौढ इसम 6 ते 10 डिसेंबरदरम्यान नेपाळ येथे पर्यटनासाठी गेल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रकृती धोक्याबाहेर : आरोग्य यंत्रणेची माहिती
कोरोनाचा नवीन व्हेरियंट हे देशाच्या कान्याकोपर्यात वेगाने पसरत असल्याची माहिती समोर आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ठिकठिकाणी चाचण्यांना वेग आलेला आहे. या अनुषंगाने घेण्यात आलेल्या चाचण्यांमधून भुसावळ तालुक्यातील कुर्‍हेपानाचे या गावातील 43 वर्षाचा रूग्ण हा कोरोनाने बाधीत आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या रुग्णाची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली असून रुग्णाच्या संपर्कातील 14 जणांच्या चाचण्या निगेटीव्ह आल्याचे सांगण्यात आले.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !